Shiv Sena UBT Dasara Melava : ठाकरे सेनेत मोठ्या संघटनात्मक बदलाचे संकेत, शिवतीर्थावरून घोषणा होणार?

#shivsenaubt #uddhavthackeray #aaditythackeray #tejasthackeray #dasaramelavaमहाराष्ट्रात सध्या दोन शिवसेना आमने-सामने आहेत—एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दुसरी उद्धव ठाकरेंची शिवसेना. दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे मुंबईत होत असले, तरी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते शिवतीर्थाकडे. आज शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडतोय. या मेळाव्याकडे लक्ष लागलंय कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या या दसरा मेळाव्यातून ठाकरे सेनेत मोठ्या संघटनात्मक बदलांची नांदी होणारे! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आगामी २०२९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावरून कुठल्या मोठ्या राजकीय घोषणा करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी पदोन्नती होणार का? तेजस ठाकरे अधिकृतपणे राजकारणात सक्रिय होऊन युवा सेनेची धुरा सांभाळणार का? अशी चर्चा का होतेय? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया.. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..
Read more