अमेरिकेत वर्क परमिटचं ऑटो एक्सटेंशन बंद, H-1B व्हिसाधारकांच्या जोडीदारांना फटका

अमेरिकेने आपल्या वर्क परमिट म्हणजेच EAD -- Employment Authorization Document बाबत एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अमेरिकन प्रशासनाने वर्क परमिटचे मिळणारे 'ऑटो-एक्स्टेंशन' बंद केलंय. सोप्या भाषेत सांगायचे तर, आधी वर्क परमिट रिन्यूसाठी अर्ज केल्यावर जुने परमिट संपले तरी पुढे काम सुरू ठेवण्यासाठी जो अधिकचा वेळ मिळायचा, तो आता मिळणार नाहीये. या एका निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या १ लाखांहून अधिक भारतीय कुटुंबांना, विशेषतः H-1B व्हिसाधारकांच्या पती किंवा पत्नींना म्हणजेच H-4 EAD holders ना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पण नक्की हा नियम काय आहे? यामुळे कोणाची नोकरी धोक्यात येऊ शकते? आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया- त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..
Read more