Deference to Prior Approvals रद्द करण्याचा Donald Trump यांचा पुन्हा घाट, भारतीयांचं टेन्शन वाढलं
जर तुम्ही अमेरिकेत नोकरी करत असाल, किंवा अमेरिकेत जाऊन काम करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकन प्रशासनाने H-1B व्हिसा आणि इतर वर्क व्हिसाबाबत असा एक नवा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीय आयटी प्रोफेश्नल्स आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहे. होय, अमेरिकेच्या 'डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी'ने (DHS) 'डेफरन्स टू पास्ट अप्रुव्हल्स' हे धोरण रद्द करण्याचा प्रस्ताव आणला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, "जर तुमचा H-1B व्हिसा आधी मंजूर झाला असेल, तर तो पुढे एक्स्टेंड (नवीकरण) करताना आधीच्या निर्णयाचा विचार केला जाणार नाही."पण या एका निर्णयाचा भारतीयांवरच एवढा मोठा परिणाम का होणार? 'डेफरन्स पॉलिसी' म्हणजे नेमकं काय? आणि यामुळे हजारो भारतीय कुटुंबांना अमेरिका सोडावी लागू शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या सविस्तर व्हिडिओ एक्सप्लेनरमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण या नियमाचा संपूर्ण इतिहास, सध्याची आकडेवारी आणि भारतीयांवर होणारा प्रत्यक्ष परिणाम सविस्तर पाहणार आहोत
Read more