US Immigartion नियम कडक, ट्रम्प प्रशासनाकडून ३ लाख व्हिसा रद्द; भारतीयांवर काय परिणाम होणार?
अमेरिकेच्या State Departmentने एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने तब्बल ३ लाखांहून अधिक अमेरिकन व्हिसा रद्द केले आहेत. अमेरिकेच्या इतिहासात इतक्या जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणावर व्हिसा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेच्या सीमा सुरक्षा आणि स्थलांतर कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पण हे ३ लाख व्हिसा कोणाचे रद्द झाले आहेत? त्यामागे काय कारणे आहेत? आणि मुख्य म्हणजे, याचा अमेरिकेत राहणाऱ्या किंवा जाणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थी आणि आयटी व्यावसायिकांवर काय परिणाम होणार? या सर्व प्रश्नांचे सविस्तर आणि सोप्या भाषेतील समजून घेऊयात..
Read more