इन्स्टाग्रामवर भाजप, काँग्रेसला मागे टाकणाऱ्या Cockroach Janta Party वर पहिली कारवाई, काय घडलं?
#cockroachjantaparty #CJP #abhijeetdipke फक्त ५ दिवसापूर्वी कोणत्याही कोट्यवधींच्या फंडशिवाय, कोणत्याही बड्या राजकीय नेत्याच्या पाठिंब्याशिवाय आणि कोणत्याही पारंपारिक प्रचाराशिवाय... एका सोशल मीडिया अकाउंटने भारताच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला. या सोशल मिडिया अकाऊंटचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. अवघ्या ६ दिवसांत म्हणजे मी आज हा व्हिडिओ करतेय तोपर्यंत या पार्टीच्या इंस्टाग्राम पेजने तब्बल १३ दशलक्ष म्हणजेच १३ मिलिअनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला! या कॉकरोच जनता पार्टीनं देशातील सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्ष भाजपलाही सोशल मीडिया फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकलंय. कॉकरोच जनता पार्टीची ही लोकप्रियता पाहता आधी त्याचं X अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर भारतात हे X अकाऊंट हॅकही करण्यात आलंय. पण ही 'कॉकरोच जनता पार्टी' नक्की आहे काय? कॉकरोच जनता पार्टीचा वाढता आलेख पाहून कोणाचे धाबे दणाणलेत? चला सगळं या व्हिडिओतून समजून घेऊ... नमस्कार
Read more